धुपाची ओळख भाग 2 | Introduction Of Incense Part 2
Introduction of Incense Incense हा शब्द Incendere या मुळ लॅटिन शब्दापासून तयार झाला आहे, ज्याचा अर्थ जाळणे असा होतो. धुपाचा उगम कधी आणि कुठे झाला यावर अनेक मतभेद आहेत. याविषयी अनेक दंतकथा हि इंटरनेटवर उपलब्ध आहेत. हे जरी खरे मानले तरी सुद्धा आजच्या मितीला भारत हा जगातील मुख धूप उत्पादक आहे . आणि धूप जाळणे हा हजारो वर्षांपासून हिंदू धर्माचा मूलभूत भाग आहे. धूप कसा तयार झाला यावर एक सुंदर आख्यायिका आहे. एका राणीने तिच्या राज्यावर शत्रूने केलेल्या अनपेक्षित हल्ल्यामध्ये स्वतःचे राज्य गमावले. तिला फार वाईट वाटले. ती खूप रडू लागली. रडत रडतच तिने युद्धात झालेल्या जमिनीच्या नुकसानीबद्दल आणि मारल्या गेलेल्या असंख्य सैनिकांसाठी देवाकडे प्रार्थना केली. तिच्या या वाहणाऱ्या अश्रुंमधूनच Sweet Gum Trees ची निर्मिती झाली. धुपाची व्याख्या करायची झाली तर धूप म्हणजे एक सुगंधी Biological Material जे जाळल्यावर एक सुगंधी आणि सुंदर वातावरण तयार होते. ज्याचा उपयोग वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कारणासाठी करता येतो. पण जर नीट विचार विचार केला केला तर एक गोष्ट लक्षात येईल कि, धुपामध्ये वापरल्या गे