धुपाची ओळख भाग 2 | Introduction Of Incense Part 2
Introduction of Incense |
Incense हा शब्द Incendere या मुळ लॅटिन शब्दापासून तयार झाला आहे, ज्याचा अर्थ जाळणे असा होतो. धुपाचा उगम कधी आणि कुठे झाला यावर अनेक मतभेद आहेत. याविषयी अनेक दंतकथा हि इंटरनेटवर उपलब्ध आहेत. हे जरी खरे मानले तरी सुद्धा आजच्या मितीला भारत हा जगातील मुख धूप उत्पादक आहे. आणि धूप जाळणे हा हजारो वर्षांपासून हिंदू धर्माचा मूलभूत भाग आहे.
धूप कसा तयार झाला यावर एक सुंदर आख्यायिका आहे. एका राणीने तिच्या राज्यावर शत्रूने केलेल्या अनपेक्षित हल्ल्यामध्ये स्वतःचे राज्य गमावले. तिला फार वाईट वाटले. ती खूप रडू लागली. रडत रडतच तिने युद्धात झालेल्या जमिनीच्या नुकसानीबद्दल आणि मारल्या गेलेल्या असंख्य सैनिकांसाठी देवाकडे प्रार्थना केली. तिच्या या वाहणाऱ्या अश्रुंमधूनच Sweet Gum Trees ची निर्मिती झाली.
धुपाची व्याख्या करायची झाली तर धूप म्हणजे एक सुगंधी Biological Material जे जाळल्यावर एक सुगंधी आणि सुंदर वातावरण तयार होते. ज्याचा उपयोग वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कारणासाठी करता येतो. पण जर नीट विचार विचार केला केला तर एक गोष्ट लक्षात येईल कि, धुपामध्ये वापरल्या गेलेल्या अनेक पदार्थांना जळल्याशिवाय सुगंध येत नाही. म्हणूनच मागच्या लेखात म्हंटल्या प्रमाणे राख हि स्वतःच्या बलिदानाचे प्रतिक आहे.
पुरातत्वशास्त्रज्ञांना अनेक प्रकारांमध्ये आणि जवळजवळ प्रत्येक संस्कृतीमध्ये धुपाचा वापर असल्याचे पुरावे सापडले आहे. मेसोपोटेमिया, फेनिशिया, अरेबिया, इजिप्त, भारत, ग्रीस आणि रोम या प्राचीन संस्कृतीमध्ये धूप मोठ्या प्रमाणावर वापरला जायचा असे म्हंटले जाते. यावरूनच धुपाचा वापर किती काळापासून चालू आहे हे समजत. चला तर मग पुढच्या काही लेखांमधून आपण धूप वापरण्याची कारणे आणि त्याचे मानवी जीवनावर, मनावर होणारे चांगले वाईट परिणाम यावर चर्चा करूयात.
Thank you
Sonal Pandit
Aadya Exim
Email :- aadyaexim.udyami@gmail.com
Website :- www.aadyaex.com
Mob. 7798136101 / 8010176526
Nice attah ajun lokana vachta yeyil 👍
ReplyDeleteNakkich. Thank you
DeleteKharach khupach sunder lihile aahe.
ReplyDeleteThank you
DeleteChaan
ReplyDeleteThank you
DeleteI admire your writing skills👏🏻
ReplyDeleteKeep writing 👍🏻
Thank you
Delete